शहरालगतच्या खेर्डी ग्रामपंचायत मध्ये लवकरच लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती युवासेना तालुकाधिकारी उमेश खताते यांनी दिली आहे.याबाबत त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे फोन वर चर्चा करत व पत्रव्यवहार करून तशी मागणी केल्याचे सांगितले.
कोरोनोचा कहर सध्या संपूर्ण देशाप्रमाणेच महाराष्ट्रात चालू आहे. लसीकरण संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने चालू आहे अशावेळी कोरोनावर मात करायच असेल तर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. सध्या लसीकरण चिपळूण तालुक्यात काही ठरावीक केंद्रात चालू असल्यामुळे एकाच ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे .त्यामुळे लसीकरणाला खुप वेळ लागत आहे.
गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदर गर्दीत कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तरी चिपळूण तालुक्यातील खेर्डी गाव मोठ आहे .सदर गावाची लोकसंख्या २०,००० च्या आसपास आहे तरी खेर्डी ग्रामपंचायतला लसीकरणाची परवानगी दिल्यास नागरीकाना दुसरीकडे न जाता गावातच लस घेणे शक्य होईल. अशी मागणी उमेश खताते यांनी केली आहे .याबाबत खासदार विनायक राऊत साहेब यांनी आपण तशाप्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासन यांना करतो प्रशासनाला करतो असे आश्वासन दिले आहे