(संगलट / वार्ताहर)
खेड नगर परिषद हद्दीमध्ये सुर्वे इंजिनिअरिंग या ठिकाणी पाण्याची मेन लाईन फुटल्याने गेल्या दोन महिन्यापासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे नागिरकांना कमी दाबाच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. जनतेच्या समस्यांबाबत सतत जागरूक असणारे शिवसेनेचे तडफदार नेते सतीशभाई चिकने यांनी यावेळेही आवाज उठवून देखील नगर परिषदेच्या अधिकाऱ्याना याबाबत जाग येत नसल्याने ही खेदाची बाब असल्याचे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदरच्या बाबीकडे खेड नगरपरिषदेने त्वरित दखल घेतली नाही तर हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सतीश भाई चिकणे यांनी पत्रकाराना दिली.