सध्या दापोली मतदारसंघामध्ये तसेच खेड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांना उपचार करण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये बेड अपुरे पडत आहेत. अशावेळी सर्व कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते उपचार व्हावेत यासाठी खेड शहरातील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीमध्ये सोयी सुविधा युक्त कोव्हिड केअर सेंटर बनविण्याचा निर्णय दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. योगेश कदम यांनी घेतला.
आमदार योगेश कदम यांनी कोरोनावर मात करताच प्रथम सदर खेडमधील शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या इमारतीची प्रशासकीय व वैद्यकिय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली व येत्या २ दिवसांत १०० बेड्सचे कोव्हिड केअर सेंटर सुरू करणार असल्याची माहिती दिली. तसेच सदर कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी एमडी डॉक्टरांना रुजू होण्याची मागणीदेखील करण्यात आली आहे.
सदर वेळी प्रांताधिकारी श्री. अविशकुमार सोनोने, खेडच्या तहसिलदार सौ. प्राजक्ता घोरपडे, खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. शेळके, कळंबणी उपजिल्हारुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. श्री. सगरे, खेड नगर परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोफीया शेख, माजी जिल्हाप्रमुख श्री. शशिकांत चव्हाण, माजी जि. प. बांधकाम समिती सभापती व विद्यमान सदस्य श्री. चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, योगिता डेंटल कॉलेजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सौ. हेमांगी पोळ, खेड पंचायत समिती सभापती सौ. मानसी जगदाळे, युवा सेना जिल्हाअधिकारी श्री. अजिंक्य मोरे, नगरसेविका सौ. नम्रता वडके, माजी नगरसेवक श्री. संजय मोदी, महिला आघाडी शहरसंघटीका सौ. माधवी बुटाला, माजी नगरसेवक श्री. राजेश बुटाला उपस्थित होते.