(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील व मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लवेल गावाजवळील सुगरण धाब्याजवळ मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी दुचाकीस्वार (नंबर एमएच 05 BN 1045) वरील दुचाकीस्वार मनीष मनोहर महाले (वय 38 रा., कांदिवली, मुंबई) हा महामार्गावरील आडवा आलेल्या बैलाला वाचविण्याच्या नादात आपल्या ताब्यातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर दुचाकी घसरत गेली. त्याच दरम्यान भरघाव वेगाने चिपळूणच्या दिशेने जाणारा टॅन्कर चालकाचा (नंबर व चालकाचे नाव समजले नाही) आपल्या ताब्यातील टॅन्करवरील वेगावर नियंत्रण न राहिल्याने रस्त्यावर आडवा पडलेल्या मयत दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच मरण पावला.
हा अपघात आज मंगळवार दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4.15 वाजताच्या सुमारास घडला. अपघाताची खबर मिळताच वहातुक पोलीस व लोटे पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस अपघातस्थळी दाखल होत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मयत दुचाकीस्वाराला रुग्णवाहीकेने कळबणीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणी करून दुचाकीस्वार मनीष मनोहर महाले हा इसम मृत पावल्याचे घोषित केले. मयताचा मृतदेह कळबणी उपजिल्हा रूग्णालयाच्या शवविच्छेदनासाठी शवागारात ठेवण्यात आला. तर अपघाताचा पंचनामा पोलीसांनी करून या अपघातात व दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठरल्याप्रकरणी टॅन्कर चालकाला ताब्यात घेतला असल्याचे समजते. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.