(खेड / प्रतिनिधी)
तालुक्यातील भडगाव-खोंडे गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या नारिंगी नदीपात्रातील जॅकवेलमधील पाणी खेचणारा पाण्याचा पंप चोरी प्रकरणी अज्ञातावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत भडगाव-खोंडे ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा करणारे कर्मचारी सुधीर देवजी शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. नारिंगी नदीजवळ भडगाव-खोंडे ग्रामपंचायतीची जॅकवेल आहे. या जॅकवेलमध्ये 140 किलो वजनाचा पंप होता. शिंदे हे पाणी सोडण्यासाठी आले असता हा पंप चोरीस गेल्यचे निदर्शनास आले. त्यानुसार अज्ञातावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.