(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नुकत्याच आंबेडकर हॉल मैदान, शिवतर रोड, खेड येथे तालुकास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत श्री काळकाई कला, क्रीडा केंद्र भरणे विजेता तर जय गणेश खेड या संघाने उपविजेतेपद पटकावले. तृतीय क्रमांक श्रीकृष्ण भडगाव तर खेमझोलाई देवघर यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.
विजेता संघाला ₹-७७७७/- आकर्षक चषक, उपविजेता संघाला ₹-५५५५/- आकर्षक चषक तर तृतीय व चतुर्थ संघांना प्रत्येकी ₹-१५००/- व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू काळकाई कला, क्रीडा,केंद्र भरणेचा अथर्व धुमाळ, उत्कृष्ट पकड काळकाई भरणे संघाचा स्वप्नील बैकर तर उत्कृष्ट रायडर जय गणेश संघाचा अक्षय जाधव यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
सदर स्पर्धेचे निरीक्षक श्री.दाजी राजगुरू, पंचप्रमुख श्री. शरद भोसले, यांनी तर प्रो कब्बड्डी पंच श्री. आशुतोष साळुंखे, श्री.अमोल दळवी,श्री.संतोष शिर्के,श्री.उल्हास शेलार, श्री.परेश खोपडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव श्री. रवींद्र बैकर, ज्येष्ठ पंच श्री. दादा बैकर, मंडणगड असो. पदाधिकारी, राष्ट्रीय पंच श्री.सचिन सकपाळ, उद्योजक श्री.सचिन कदम मुंबई,श्री. तुषार सापटे, श्री. बुवा शिंदे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीतेसाठी श्री. वैभव नारायण खेडेकर, श्री.अमित खेडेकर, श्री.अनिकेत खेडेकर, श्री. राकेश खेडेकर, श्री विशाल खेडेकर यांनी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण स्पर्धेचे आपल्या ओघावत्या शैलीत समालोचक श्री. क्षीरसागर सर, दापोली यांनी केले. उत्तम स्पर्धा आयोजनाबद्दल खेड तालुका कब्बड्डी असो.च्यावतीने आयोजकांचे विशेष आभार मानून स्पर्धेची सांगता करण्यात आली.