( खेड )
खेड मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एस.टी. बस मुख्य रस्त्यावर घेऊन वळवताना बसच्या पाठीमागील बाजूचे चाक ७९ वर्षीय वृध्दाच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तालुक्यातील काडवली वेळणे फाटा येथील बस थांब्यानजीक शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी एस.टी. बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सूर्यकांत रामचंद्र महाडिक (रा . काडवली पाचघरवाडी) असे या जागीच मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. तर या प्रकरणी त्यांचा मुलगा संतोष महाडिक यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वृद्ध सूर्यकांत महाडिक हे चिपळूण ते काडवली वेळणे फाटा असा प्रवास करून ते बस थांब्यावर उतरले मात्र बसचालक सदाशिव शिवराम चिले (५३ , रा . मालघर माजे वाडी, चिपळूण) हे त्यांच्या ताब्यातील बस क्र . एम एच २० बी एल १२४१ ही मुख्य रस्त्यावर घेत असताना डाव्या बाजूस वळण घेताना एस.टी.च्या मागील चाकाखाली सूर्यकांत महाडिक हे आल्याने त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी बस चालक चिले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.