( जाकादेवी/संतोष पवार )
खेड तालुक्यातील सर्वात जुने एमकेसीएलचे (MKCL) प्रशिक्षण केंद्र असलेल्या सिद्धी कॉम्प्युटर (टेक्नोवेव कॉम्प्युटर) या संगणक प्रशिक्षण संस्थेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एमकेसीएलच्या विभागीय बैठकीत गौरविण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेतून शेकडो विद्यार्थी आणि शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी एमएससीआयटीचा (MSCIT) अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात हे प्रशिक्षण केंद्र सातत्याने प्रयत्नशील असते.
खेड तालुक्यातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एस टी स्टॅड शेजारी संगणक प्रशिक्षण सेवा देणारी सिद्धी कॉम्प्युटर (टेक्नोवेव कॉम्प्युटर) ही सर्वात जुनी (21 वर्षांपूर्वीची) प्रशिक्षण संस्था आहे. २०२० ते २०२१ कोरोना काळात तग धरू पाहणारी ही संस्था रत्नागिरी येथील युवा प्रशिक्षक श्री अक्षय श्रीकृष्ण देसाई यांनी त्यांची रत्नागिरी येथील टेक्नोवेव कॉम्प्युटर( कारवांचीवाडी बस स्टॉप रत्नागिरी ) या संस्थेच्या अधिपत्याखाली आणली .त्या संस्थेला जणू पुनर्जन्मच दिला. २००१ साली या संगणक प्रशिक्षण केंद्राला एमकेसीएलचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता मिळाली. नंतर ही संस्था विद्यार्थ्यांच्यामध्ये नावारूपाला आली. या संस्थेचे मालक श्री.अक्षय देसाई यांनी त्यांची पहिली संस्था टेक्नोवेव कॉम्प्युटर ( कारवांचीवाडी बस स्टॉप रत्नागिरी )ही शून्यातून सुरु करुन नावारूपाला आणली. त्याकरिता त्यांचे आई-वडील, भाऊ, काका, इतर भावंडे व गणेश कॉम्प्युटरचे मालक गणेश पाटील यांचे पाठबळ लाभले. सुरवातीच्या काळात अनेक गरीब, होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत दिली. काही विद्यार्थ्यांची फी स्वत:च्या खिशातून भरली तर काही वेळा नुकसानही सोसले. असा प्रवास करता करता जून २०२० साली या संस्थेचे मालक अक्षय देसाई यांनी आपल्या टेक्नोवेव कॉम्प्युटर संगणक संस्थेला जिल्हा पातळीवर नावारूपाला आणायचे ठरवले. आणि २०२० साली ही संधी त्यांना मिळाली व त्यांनी सिद्धी कॉम्प्युटर (टेक्नोवेव कॉम्प्युटर) ही कोरोना काळात तग धरू पाहणारी संस्था आपल्या अधिपत्याखाली आणली व लवकरच त्या संस्थेचे नाव त्यांची प्रथम संस्था टेक्नोवेव कॉम्प्युटर ( कारवांचीवाडी बस स्टॉप रत्नागिरी ) असे करण्याचे प्रयोजन आहे.
एमकेसीएलचे सर्व अभ्यासक्रम शिकविण्यासाठी या दोन्ही संगणक प्रशिक्षण केंद्रात अद्ययावत संगणक कक्ष, स्वतंत्र क्लासरुम आदी सुविधा आहेत. Klic चे अभ्यासक्रम इथे शिकविले जातात. प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला परिपूर्ण ज्ञान मिळावे म्हणून अक्षय देसाई , सौ. सोनम देसाई व त्यांचे अन्य प्रशिक्षक मेहनत घेतात. विद्यार्थ्याला त्याच्या कोर्सच्या वेळ व्यतिरिक्त जादा प्रशिक्षण दिले जाते. नेहमीच्या जगण्यात आपण कॉम्प्युटरचा योग्य वापर करून आपली कामे सोपी कशी करू याकरिता अक्षय देसाई यांचे जास्त लक्ष असते. विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी आपल्या घरच्या मोठ्या माणसाना शिकविण्याचा अट्टाहास असतो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून ते निवृत्त ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी या संस्थेच प्रशिक्षण घेतले आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एमकेसीएलच्या सर्व अधिकृत प्रशिक्षण केंद्रांची विभागीय बैठक (Regional Meeting) शुक्रवार दि. ०२ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये सिद्धी कॉम्प्युटरचे अक्षय देसाई यांचा एमकेसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका मा. विणा कामत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्हातील एमकेसीएलचे वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षण केंद्र प्रमुख उपस्थित होते.