खेड नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ अल्पिका पाटणे यांनी त्यांच्या वाढदिवस निमित्त दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या १०० बेडचे शिवतेज कोविड केअर सेंटर येथे कोविड रुग्णांना फळांचे वाटप केले.
सदर वेळी शिवसेना शहरप्रमुख निकेतन पाटणे , शिवसेना न प गटनेते प्रज्योत तोडकरी, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, प्रवक्ते श्री संजय मोदी , श्री मिनार चिखले, उपशहरप्रमुख निलेश जोशी, न प समन्वयक राजेश बुटाला, नगरसेविका नम्रता वडके, मनीषा निर्मळ, नगरसेवक प्रशांत कदम, विभागप्रमुख अभिजीत चिखले , संदीप करवा , प्रशांत मिर्लेकर, मानस कानडे, वैभव डोळस, मुन्ना मोरे उपस्थित होते.