खेड कर्जी येथील रहिमत मोहल्ला व गवळवाडीकडे जाणारा रहदारीचा रस्ता दोन्ही बाजूने खचल्याने या रस्त्यावरून चालणे धोक्याचे झाले आहे. सध्या असलेल्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता पूर्ण वाहून जाण्याची शक्यता आहे. याबाबत रहिमत मोहल्ला व गवळवाडी येथील ग्रामस्थांना कल्पना देऊन या रस्त्यावरून वाहतूक किंवा रहदारी करु नये यासाठी तलाठी कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
रहिमत मोहल्ला येथे एकूण 104 कुटुंब असून 365 लोकसंख्या आहे. गवळीवाडी येथे 80 कुटुंब असून 275 लोकसंख्या आहे. मात्र दोन दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर परिणाम होऊन वाहून जाण्याची शक्यता आहे. याचा विचार करून तलाठी कार्यालयाकडून रेशन दुकानदार मुश्ताक तांबे यांना रहिमतमोहल्ला व गवळवाडी येथील ग्रामस्थांना शासकीय शिधा वाटप प्राप्त झाल्यावर त्वरित ग्रामस्थांना वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांच्या शिधावाटपाबाबत कोणतीही अडचण येऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या रस्त्यावरुन शाळेतील मुलांची रहदारी आहे. त्यामुळे त्यांनाही सुरक्षा बाबतीतील सूचना देण्यात आल्या आहेत.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !