(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर शिवफाटा येथे गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनिल शिवराम चव्हाण ऊर्प अनिल बुवा (रा. दाभिळ-पुंभारवाडी) या संशयितास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिवफाटा येथील टोलनाका येथे गांजाचा साठा घेऊन ग्राहकांना विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने रचलेल्या सापळ्यात 42 हजार 750 रुपये किंमतीचा गांजा व 13 हजार 320 रुपये रोकड तसेच अन्य साहित्य असा 68 हजार 720 रुपयांच्या ऐवजासह रंगेहाथ पकडण्यात आला.
त्याने हा गांजा नेमका कुठून आणला?, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा येथील पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.