( खेड / प्रतिनिधी )
खेडमधील काळकाई मंदिरात पती पत्नी झोपलेली असताना संशयिताने पत्नीवर अतिप्रसंग करणाऱ्याला हटकण्याचा प्रयत्न करत असताना सुरेश कोळे याच्या डोक्यात लाकडी बांबू मारून गंभीर रित्या जखमी केल्याची घटना घडली होती. या मध्येच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना 20 मे 2022 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. या खून प्रकरणातील संशयित दिनेश दत्ताराम चाळके (सुकिवली) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्यानंतर खटला चालू झाला. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिनेश चाळके याची जामिनावर मुक्तता केली.
20 मे 2022 रोजी सुरेश कोळे हा आपल्या पत्नीसह काळकाई मंदिर परिसरात झोपला होता. त्यावेळी दिनेश चाळके याने मध्यरात्री त्याच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने पतीला उठवले असता पत्नीची अब्रू वाचवण्यासाठी पती पुढे सरसावला. मात्र दिनेश चाळके याने पतीच्या डोक्यात लाकूड मारून गंभीररित्या जखमी केले होते. उपचारा दरम्यान दुसऱ्या दिवशी पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर दिनेश चाळके हा फरार होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी 15 दिवसांनी संशयित दिनेश चाळके यास गजाआड केले होते.
यापकरणातील संशयित दिनेश चाळके याची जामिनावर सुटका व्हावी यासाठी अॅड. सुधीर बुटाला यांनी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली असता अॅड. बुटाला यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.