इक्बाल जमादार, संगलट (खेड)
खेड तालुक्यातील महत्त्वाचा पुल म्हणून भोस्ते पूल ओळखला जातो. या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते. या वाहतुकीबाबत जिल्हा परिषद बांधकाम खात्याने देखील नाम फलक लावलेला आहे. तरी या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते तसेच ह्या पुलावरून केबल टाकण्यासाठी अनाधिकृत आरसीसी बांधकाम करण्यात आले आहे.
यांना केबल टाकण्यासाठी परवानगी कोणी परवानगी दिली ? सध्या या पुलावरून टाकलेले केबल चोरीस गेल्याचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे केबलचे बांधकाम तोडण्यात आले आहे. पुलावरील एक ते दोन फूट बांधकाम तोडण्यात आले असल्याची माहितीचे निवेदन बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी जिल्हा परभणी यासीनभाई परकार आणि ग्रामस्थानी आपल्या सह्या करून बांधकाम खात्याला दिले आहे. त्यामुळे लोकांना या पुलावरून चालणे तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाणी मोठ्या प्रमाणात साचलेले असते, तरी या पुलाचे तातडीने तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन सारखा मार्ग स्वीकारावा लागेल असेही निवेदनात म्हटले आहे. तरी याबाबत बांधकाम खात्याने कारवाई करावी अशी मागणी यासीनभाई परकार आणि ग्रामस्थांनी केली आहे.