(खेड)
खेड तालुक्याला एन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ९ गावे आणि १२ वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्याची माहिती खेड पंचायत समितीच्यावतीने देण्यात आली.
तर आणखी चार गावांतून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.