(संगलट / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील खारीपट्टा विभागातील सवणस गावचे अकबर मोहम्मद अली सुर्वे मुंबई पोलीस दलामध्ये नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांनी मुंबई येथे आपली सेवा बजावत असताना अनेक गुन्हेगाराला जेर बंदकरण्यासाठी यशस्वी कामगिरी केली आहे. त्यांना अनेक वेळा चांगल्या कामगिरीबद्दल शासनाकडून गौरवण्यात आले होते. त्यांची कामगिरी पाहून पोलीस दलामध्ये त्यांनी अभिमानास्पद सेवा केली आहे. त्यांच्या निवृत्तीच्या वेळी अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील शुभेच्छा दिल्या.