( संगलट / इक्बाल जमादार )
खेड तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी यांची विशेष कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र शासन) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ, खेड अध्यक्ष संतोष कापसे, युवक अध्यक्ष विकास धोत्रे, सरचिटणीस संदीप तांबे, उपाध्यक्ष विशाल तांबे, रोजगार आघाडी तालुका अध्यक्ष प्रशांत गमरे, युवक संघटक सचिन शिर्के यांच्यासह पदाधिकारी यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम तसेच आमदार योगेश कदम, पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून सदर नेमणूक करण्यात आली आहे. कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ यांनी पुढाकार घेऊन खेड तालुक्यातील पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.
खेड तालुक्यातील पदाधिकारी यांच्यामध्ये या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नियुक्ती झालेल्या पदाधिकारी यांचे खेड तालुका अध्यक्ष संतोष कापसे यांनी स्वागत केले आणि अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी उपस्थित कोकण प्रदेश प्रांत अध्यक्ष सुशांत भाई सकपाळ खेड, तालुका अध्यक्ष संतोष कापसे, कार्याध्यक्ष मिलिंद तांबे, सरचिटणीस सुरेंद्र तांबे, उपाध्यक्ष बाळकृष्ण देवळेकर, जिल्हा युवक संपर्क प्रमुख गणेश शिर्के, युवक अध्यक्ष विकास धोत्रे युवक संघटक समीर सकपाळ आदी उपस्थित होते