(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता खेड तालुक्यातील कोंडवली धरणात आठ वर्षाच्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून धरणात बुडालेले दोघे ही निळीक गावचे असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले
भर रमजान महिन्यात आणि ईदच्या तोंडावर मृत्यू झाल्याचे बुडून निळीक गावाला हादरा बसला आहे. संपूर्ण निळीक गाव या प्रकारामुळे दुःखाच्या छायेमध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील निळीक येथील इमरान याकूब चौगुले (40 ) आणि सोहन फैजान चौगुले(8 ) हे दोघे कोंडवली धरणावर फिरण्यासाठी गेले होते. धरणाच्या पाण्यामध्ये दोघेही बुडाले असल्याची माहिती मिळताच, या ठिकाणी ग्रामस्थाने मोठ्या प्रमाणात धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर होऊन गेला होता.
सदरच्या बाबीमुळे ग्रामस्थानी त्वरीत खेड पोलिस ठाण्याकडे संपर्क साधला. दुर्घटनेची माहिती मिळताच खेड पोलिस तत्काळ कोंडवली धरणावर धाव घेत, धरणात बुडालेल्या दोघांचे शोध घेण्यास सुरुवात केली. धरणामध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणात पाणी तसेच महाकाय व मोठ-मोठे मगर चा वावर असल्यामुळे शोध घेण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र पोलिसांनी शोध कार्य मोठ्या प्रमाणात सुरू ठेवले होते.
मात्र सुमारे साडे आठ नऊच्या दरम्यान पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी दोन्ही जणाचे मृतदेह p m साठी खेड्यातील कलबनी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
धरणावर फिरण्यासाठी गेले दोघे कसे बुडाले हे अद्याप समजू शकले नाही. मात्र पोलिस तपासात हा प्रकार सेल्फी काढताना घडला असल्याचे बोलले जात आहे. सदर सेल्फी फोटो काढत असताना तोल गेले असावे असेही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चार दिवसापूर्वी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी धरणात चार जण बुडाले होते. त्यातील दोघांना वाचवण्यात स्थानिक यश आले होते, तर दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना खेड तालुक्यातील कोंडवले धरणात आठ वर्षांच्या मुलासह दोघांचा बुडून मृत्यू झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील धरणे सुरक्षित आहेत का? असा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होऊ लागला आहे. दोघाचा मृत्यु अचानक भर रमजान महिन्यामध्ये गेल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होत असून याबाबत खेड पोलिस अधिक तपास करीत आहेत