(खेड)
खेड तालुक्यातील केळणे येथील श्री रामवरदायिनी, श्री केदार श्री काळकाई श्री पद्मावती मंदिराचा जिर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा दिनांक २१ ते २३ मे दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तसेच केळणे नं. १ शाळेचा अमृतमहोत्सव सोहळादेखील होणार आहे.
रविवार दि. २१ मे रोजी पहाटे ५ ते ७ वा. वास्तुशांती व विविध धार्मिक विधी, सकाळी ८ ते २ वाजता मुर्ती व कलश मिरवणूक (ऑ.कॅ. श्री. शशिकांतराव कदम आंबडस यांचे निवासस्थान ते श्रीरामवरदायनी मंदिर केळणे), दुपारी २ ते ३ वाजता महाप्रसाद, दुपारी ३ ते ४ वाजता प्रवचन- ह.भ.प. जगन्नाथ म्हस्के महाराज, सायंकाळी ४ ते ६ वाजता धान्यादीवास, जलादीवास, सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ (वारकरी सांप्रदाय पंचक्रोशी), सायं. ७ ते ९.३० वा. हरिकीर्तन (ह.भ.प. रुपेश महाराज राजेशिर्के- वेहेळे) (कोकण दिंडी समाज), रात्री ९.३० ते ११ वा. महाप्रसाद, रात्री ११ नंतर हरिजागर- (केळणे गावठण, भातवडेवाडी, धनगरवाडी व ग्रामस्थ)
सोमवार दि. २२ मे रोजी पहाटे ४ ते ५ वा. काकड आरती, पहाटे ५ ते ७.३० वा. अभिषेक होम हवनादी विधी, सकाळी ७.३० ते ८ वा. नूतनमुर्ती आसन व्यवस्था पूजन, सकाळी ८ ते ८.३० वा. अल्पोपहार, सकाळी ८.३० ते १० वा. मुर्ती धुपपूजन करून आसनस्थ करणे, सकाळी १० ते १२ वाजता प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, होमहवन व कुमारीकापुजन स्वामी श्री. निळकंठ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते होईल. दुपारी १२ ते १२.३० वा. उद्घाटन संदिप शांताराम कदम (केळणे- USA) यांच्या हस्ते, नंतर दुपारी १२.३० ते १.३० वा. गुरुवर्य श्री निळकंठ शिवाचार्य महाराज स्वामी यांचे प्रवचन, आरती व दर्शनसोहळा, दुपारी १.३० ते २.३० वा. महाप्रसाद, सायं. ३ ते ५ वा. जि.प. शाळा केळणे नं.१ अमृत महोत्सव कार्यक्रम सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ, ७.३० ते ९.३० वा. हरिकर्तन, रात्री ९.३० ते १०.३० वा. महाप्रसाद, रात्री १०.३० नंतर हरिजागर- (गोमलेवाडी, भोसलेवाडी, मांगलेवाडी, गवळवाडी व ग्रामस्थ केळणे)
मंगळवार दि. २३ मे रोजी पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ८ ते १० वा. धालकाठी पूजन व विधीवत तोडणे, सकाळी १० ते १२ वा. धालकाठी मिरवणूक व धालकाठी रोहण, दुपारी १२ ते ९ वा. सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते २ वा. महाप्रसाद, दुपारी २.३० ते ४.३० वा. स्वागत, माहेरवाशिणी सत्कार, मान्यवरांचा सत्कार व मनोगत.
यावेळी खासदार सुनील तटकरे, शिवसेना नेते व गुहागर विधानसभा मतदारसंघ आमदार भास्कर जाधव, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार संजय कदम, माजी आमदार डॉ. विनय नातू, केशवराव भोसले, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, ह. भ. प. प्रताप महाराज राजेशिर्के, ह. भ. प. प्रभाकर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ, सायं. ७ ते ९ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. कार्यक्रम वैभव म्युझिकल डान्स ऑर्केट्रा व नाटक असे कार्यक्रम होणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीरामवरदायनी जीर्णोद्धार समिती अध्यक्ष विलास कदम (गुरुजी), सेक्रेटरी ह. भ. प. राजेंद्र कदम, खजिनदार संदीप उर्फ बावा कदम (सरपंच) व केळणे ग्रामस्थांनी केले आहे.