(खेड / भरत निकम)
रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरी या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शनिवार, दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर झाली आहे. या पतसंस्थेच्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना पुरस्कृत महायुती झाली असून झाली असून या महायुतीच्या पॅनलचा खेड तालुक्यातील मेळावा श्रीगणेश मंगल कार्यालय, भरणे येथे नुकताच संपन्न झाला.
या मेळाव्याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण काटकर, पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष मुश्ताक तांबे यांच्यासह प्राथमिक शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन विलास जाधव, प्राथमिक शिक्षक समिती राज्य सल्लागार विजय पंडित, कोकण विभागीय अध्यक्ष बळीराम मोरे , राज्य ऑडिटर अंकुश गोफणे, जिल्हा नेते दिलीप महाडिक, कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पावणे, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी व पतपेढी माजी चेअरमन सुनील सावंत, तज्ञ संचालक संजय सुर्वे, दिनेश झोरे, उर्दू शिक्षक संघटना कोकण विभागीय उपाध्यक्ष बशीर नागोठणे, जिल्हा उपाध्यक्ष अहमद नाडकर, अब्दुल्ला वावघरकर यांच्यासह महायुतीतील समाविष्ट सर्व संघटनांचे जिल्हा सरचिटणीस, जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
महायुतीच्या सर्व संघटनातील खेड तालुक्यातील शिक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हा प्रचार मेळावा पार पडला. मेळाव्याला सुमारे ३०० पेक्षा जास्त शिक्षक बंधू भगिनींची उपस्थिती होती. या मेळाव्यात महायुतीचे संपूर्ण जिल्हा पॅनल जाहीर झाले असून खेड तालुका सर्वसाधारण उमेदवार शरद शहाजी भोसले, जिल्हा पॅनल उमेदवार सर्वसाधारण प्रवर्ग सुनील दळवी, नरेश सावंत, महिला प्रवर्ग प्रांजली धामापूरकर, नाझीमा मालीम, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्ग मनोज मस्के, इतर मागास प्रवर्ग उमेश केसरकर, भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग मुकुंद वाजे यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी सर्व उमेदवार उपस्थित होते. पतसंस्थेची ध्येयधोरणे आणि मागील सहा वर्षात सभासद हिताच्या दृष्टीने करण्यात आलेला पॅनलचा कारभार याबाबत सखोल असे मार्गदर्शन जिल्हा नेते विद्यमान संचालक दिलीप महाडिक, बळीराम मोरे, चंद्रकांत पावस्कर, प्रवीण काटकर, मुश्ताक तांबे, विजय पंडित यांनी केले.
विरोधकांच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता संस्थेचे झालेले काम व संचालक मंडळाने भविष्याचा विचार करून काळानुरूप बदल करत राबविलेल्या योजना या सगळ्याचा वस्तुस्थितीदर्शक अभ्यास करून सर्व कार्यकर्त्यांनी व उपस्थित यांनी या निवडणुकीला सामोरे जावे. तसेच पतसंस्थेच्या कारभाराविषयी संशयास्पद वाटणारा कोणताही प्रवाह, विचार आपणापर्यंत आल्यास त्याची योग्य ती खातरजमा करून घेण्यासाठी महायुती पॅनल मधील सर्व प्रमुख जिल्हा पदाधिकारी व जबाबदार तालुका पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सत्यता पडताळून घ्यावी. यासाठी वस्तुस्थितीदर्शक पतसंस्था कारभाराची माहिती देण्यास सर्व जिल्हा, तालुका पदाधिकारी सज्ज आहेत, असे आवाहन सभागृहातील उपस्थितांना मार्गदर्शकांच्या वतीने करण्यात आले. तसेच शिक्षण क्षेत्रात येणारे विद्यार्थी प्रगती व अध्यापनात अडसर ठरणारे नवनवीन प्रवाह यासाठी संघटनात्मक लढा, चळवळ, निदर्शने, आंदोलने उभी करण्यास सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले.
खेड तालुक्यातील शिक्षकांची या मेळाव्यासाठी सायंकाळची वेळ असताना उपस्थितीबाबत दिवसभर शाळा असूनही उत्स्फूर्त प्रतिसाद याबद्दलही राज्य, जिल्हा पदाधिकारी यांनी खेड तालुक्याचे कौतुक केले. संपूर्ण पॅनल जाहीर झाल्याने येत्या ०४ नोव्हेंबरला पॅनल विजयाची खात्री असल्याची भावना सभागृहातील सर्व मतदार व शिक्षक बंधू भगिनींच्या मनामध्ये जाणवली.
या मेळाव्यासाठी खेड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष आणि खेड तालुक्याचे विद्यमान तालुका सर्वसाधारण उमेदवार शरद भोसले, सहसचिव धर्मपाल तांबे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तालुका अध्यक्ष सु.रा.पवार, सचिव अविनाश साळुंखे, प्राथमिक पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष श अनंत मोहिते, सचिव संदीप फागे, उर्दू प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष व निवडणूक जिल्हा प्रभारी अखलाख सावंत, सचिव खलिल परकार यांच्यासह खेड तालुक्यातील महायुतीतील सर्व संघटनांचे तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी मार्गदर्शक या सगळ्यांचे विशेष सहकार्य लाभल्याने उत्तम उपस्थिती व उत्स्फूर्त प्रतिसादात हा मेळावा जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक कांबळे तर आभार प्रदर्शन अनिल मोरे यांनी केले.