(खेड / प्रतिनिधी)
“खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (KGPA)”च्या वर्ष 2023 च्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा भरणे नाका येथील साई रिसॉर्ट मध्ये संपन्न झाला. डॉ अजित भोसले यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, तर डॉ प्रवीण राठोड (सचिव), डॉ अर्चना स्वामी(सह-सचिव), डॉ सिद्धेश चिखले(खजिनदार) यांचीही नियुक्ती करण्यात आली.
नूतन पदाधिकार्यांना KGPA मार्गदर्शक समितीचे प्रमुख डॉ.श्याम गिल्डा तसेच माजी अध्यक्ष डॉ दीपक मोरे व डॉ.अलवि, समिती सदस्य डॉ आदेश भोसले, कायदेशीर सल्लागार डॉ विलायत मुकादम आणि KGPA चे सर्व उपस्थित डॉक्टर सदस्यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
यावेळी SMS हॉस्पिटलचे प्रमुख डॉ परमेश्वर गौंड व त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते. डॉ.गौंड यांनी यावेळी विविध शस्त्रक्रियांविषयी सर्वांना मार्गदर्शन केले. डॉ वैदेही शेळके यांनी सूत्रसंचालन केले, आणि डॉ प्रवीण राठोड यांनी सर्वांचे आभार मानले.