(प्रतिनिधी / रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील खेडशी नाका परिसरात १४ फेब्रुवारी रोजी आढळलेल्या खवले मांजराला वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जीवदान देण्यात आले.
खेडशी परिसरात खवले मांजर आढळल्याची माहिती केतन साळवी यांनी वन विभागाला दिली. वन्यप्राणी बचाव पथकाने खवले मांजर ताब्यात घेवून पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सुखरुप सोडण्यात आले. या बचावकार्यात वनपाल एन एस गावडे, वनरक्षक प्रभू सावणे व शर्वरी कदम यांचा सहभाग होता.
मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.