(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या खेडशी येथील मंडल अधिकारी याला लाचलुचपत विभागाने हजारो रूपयांची लाच घेताना बुधवारी सायंकाळी पकडल्याने सर्व महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील खेडशी मंडल अधिकारी अमित चिपरीकर यांच्याविरोधात गेले अनेक महिने नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या, याची दखल घेत फिर्यादीकडून आलेल्या तक्रारीची छाननी करून हजारो रूपयांची रोकड घेताना लाचलुचपत विभागाचे प्रमुख अधिकारी सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी पकडले. सातबारा दुरूस्तीसाठी ही लाच मागण्यात आली असल्याचे सांगण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या बाबतचा तपशील पुढील प्रमाणे
युनिट – लाचलूचपत प्रतिबंधक विभाग – रत्नागिरी
तक्रारदार- पुरुष वय 49 वर्षें
आरोपी-1. अमित जगन्नाथ चिपरीकर, वय 39, मंडळ अधिकारी, खेडशी, ता. जि. रत्नागिरी
लाचेची मागणी 45,000 /- रु.
लाच स्विकारली 31,000/- रू.
हस्तगत रक्कम 31,000/- रु
लाचेची मागणी – दि. 19/04/2023
लाच स्विकारली – दि. 19/04/2023 रोजी.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांचे पक्षकार यांचे नावावर असलेला सातबारा दुरुस्ती करण्याकरिता दहा हजार रुपये तसेच त्यांचे इतर पक्षकर यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्याकरिता 21 हजार रुपये असे एकूण 31 हजार रुपये लाच रकमेची चिपरिकर यांनी मागणी करून, मागणी केलेली लाच रक्कम 31 हजार रुपये आज रोजी स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.