कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रत्नागिरी तालुक्यातील खेडशी ग्रामपंचायत व ग्रामकृती दलाच्या वतीने ग्रामपंचायत हद्दी मध्ये जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे.
सदर कर्फ्यु 13 मे ते 17 मे पर्यंत लागू करण्यात आला आहे. जनता कर्फ्यु दरम्यान सर्व किराणा माल, चिकन-मटण शाॅप, भाजीपाला व फळ विक्रेते, दूध, जनरल स्टोअर्स व इतर सर्व दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच नागरिकांनी कामाशिवाय घरा बाहेर पडल्यास 500 रु दंड व कोरोना चाचणी करण्यात येईल असा ही निर्णय घेण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवा अंतर्गत फक्त डॉक्टर व मेडिकल स्टोअर्स सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जे कोणी व्यापारी ह्या जनता कर्फ्यु च्या नियमांचे उल्लंघन करेल त्यांना 5000 रु दंड आकारण्यात येईल असे ही ग्रामकृती दलाच्या वतीने सांगण्यात आले आहे.