(रायगड)
मुंबई गोवा महामार्गावरील पेण नजिक एच. पी. पेट्रोल समोरील ब्रीजवर काल रात्रौ 10च्या सुमारास अपघात झाला. खेडवरून मुंबईला इको कारने जात असताना सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोरदार टक्कर दिल्याने मारुती इको कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.
दीपक दत्ताराम उतेकर (इको चालक) वय 33 (रा.खेड तुलसी), प्रणाली विश्वास सावंत वय 45 (रा.सांताक्रूझ), नम्रता प्रशांत कांबळे वय 29 (रा.करंजाडे पनवेल), वैशाली सुहास शिगवण वय 35 (रा.सांताक्रूझ), ऋषभ असीम अधिकारी वय 10 (रा.नालासोपारा), वनिता वसंत शिगवण वय 60 (रा.सांताक्रूझ), आरोही सुहास शिगवण वय 10 (रा.सांताक्रूझ) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्तांना पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काहींना पुढील उपचारासाठी पनवेल एम. जी. एम. रुग्णालय येथे हलविण्यात आले.