इक्बाल जमादार संगलट (खेड )
खेड दापोली मार्गावरील भरणा नाकाजवळील तालुका कृषी कार्यालयाजवळील आठवडा बाजार येथे कर्नाटक येथून दापीलीच्या दिशेने 3 लाख 43 हजार रूपये किंमतीचा गुटखा येथील पोलीस ठाण्यातील विशेष पोलीस पथक प्रमुख डिवायएसपी काशिद यांच्या नेतृत्वाखालील आणि पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे, विरेंद्र आंबेडे, साजीद नदाफ, अजय कडू, संकेत गुरव यांच्या पथकाने जाणारी तवेरा कार नंबर एमएच 08 R 8295 या कारची झडती घेता अवैध गुटख्याचा साठा आढळून आला. त्याप्रमाणे संशयीत तौफिक रज्जाक मेमन वय वर्ष 24 रा हर्णे ता. दापोली याला मुद्देमालासह आणि तवेरा कारसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गांजा पकडणे पाठोपाठ अडीच लाखाचा गुटखा जप्त करून खेड पोलीस पथक अवैध व्यवसाया विरोधात सज्ज असल्याचे दिसत आहे.