( खेड / प्रतिनिधी )
तालुक्यातील कोतवली टेप भोईवाडी येथे प्रेमसंबंधाबाबत पत्नीच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावावर भावानेच कोयतीने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. सचिन सत्यवान जुळवे (31, कोतवली, टेप भोईवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जुळवे यांच्या पत्नीला सचिनविषयी गैरसमज निर्माण झाला होता. त्याचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्याने ती त्याच्यावर रागवली होती. याच रागातून ती घराच्या माळयावर गेली होती. तिची समजून काढण्यासाठी सचिनही माळयावर सिडीने जात होता. यावेळी सख्खा भाउ संदेश जुळवे (27, कोतवली टेप, भोईवाडी, खेड ) याने सचिनला अश्लिल शिवीगाळ केली. तुला कापून टाकतो असे म्हणत कोयतीने उजव्या पायाचे खुब्यावर व उजव्या हाताचे मनगटावर वार केला. यात सचिनला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सचिन जुळवे याने दिलेल्या तक्रारीनुसार संदेश जुळवे याच्याव र खेड पोलीस स्थानकात भादविकलम 324, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.