(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
खेड हा तालुका शांतताप्रिय आहे. या तालुक्यात वावरणारे हिंदू-मुस्लीम समाजातील बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत. सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा राखत तालुक्याची शांतता अबाधित राखण्यास जनतेने नागरीकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डिवायएसपी शशिकिरण काशिद यांनी केले. तर दि. 5 मे 2022 रोजी सायंकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान तिनबत्ती नाका येथे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत पोलीसांनी दंगा काबू योजना प्रात्यक्षिक दाखवत पार पडली.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या खेड पोलीस ठाण्याच्या वतीने डिवायएसपी शशिकिरण काशिद यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस निरीक्षक सासने व येथील ठाण्याचे प्रमुख सपोनि श्री.सुजित गडदे यांच्या नेतृत्वाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना जिवे ठार मारण्याची धमकी परदेशातून आल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आली होती.
येथील पोलीस दल दंगल काबूत आणण्यासाठी परिपूर्ण व सज्ज असल्याचे दाखविण्यासाठी शहरातील सतत गजबजत असलेल्या एस. टी. स्टॅड, गांधीचौक येथे रूट मार्च व तिनबत्ती नाका येथे दंगा काबूल आणण्यासाठी प्रात्यक्षिक करण्यासाठी 05 अधिकारी, 13 अंमलदार, मुख्यालयातील 25, शीध्र कृती दलाचे 04, आरसीपीसी 30, होमगार्ड 22 असे एकुण 99 अधिकारी, कर्मचारी यांचा सामावेश होता.
पोलीसांनी हाती देह हाती डोळा प्रत्यक्षात जनतेला दाखवून पोलीस दल तयारीत असल्याचे दाखवले. तर तालुक्यातील खेडवासीय जनतेने शांतता राखावी व पोलीस दलाला सहकार्य करावे असे आवाहन डिवायएसपी शशिकिरण काशिद यांनी केले. सध्या शहरात शांततेचं वातावरण निर्माण झाले आहे.
*फोटो*
खेड शहरातील तिनबत्ती नाका येथे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दंगा काबूत प्रात्यक्षिक दाखवताना
(छाया- इक्बाल जमादार संगलट खेड )