(खेड)
खेड शहरासह तालुक्यातील नांदिवली-केळणेवाडी व दंडवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू अड्ड्यांवर धाड टाकून 3 हजार 890 रूपये किंमती ऐवज जप्त केला. या प्रकरणी विठ्ठल गंगाराम कदम, लक्ष्मण राया आखाडे, प्रकाश देवराम इनरकर यांच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.