(संगलट-खेड / प्रतिनिधी)
खेड शहरातील शिवतर रोड येथील रोहीदास नगर परिसरातील पोष्टाच्या पाठीमागे अवैध व बेकायदेशीर पैसे लावुन जुगार खेळविणा-या जुगार अड्ड्यावर पोलीसांनी धाड टाकून 7912/- रुपये आणि जुगाराचे साहित्याच्या मुद्देमालासह अमित अनंत उसरे याचेवर जुगार कायदा कलम 12(अ) अन्वये गुन्हा येथील पोलीसात गुन्हा रजिस्टर नंबर 217/महाराष्ट्र जुगार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस कंट्रोल रुम कडून प्राप्त झालेल्या एफआयआर नुसार खेड शहरातील शिवतर रोड परिसरातील रोहीदास नगर येथील पोष्टाच्या पाठीमागे अवैध व बेकायदेशीर जुगाराचा खेळ पैसे लावुन जुगार खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली. त्या आधारे पोलीसांनी शुक्रवार दि. 28/7/2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजताच्या सुमारास पोलीसांच्या पथकाने वर नमुद ठिकाणी व वेळी अचानक धाड टाकून 7910/- रु. रोकड रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. या गुन्ह्य़ाचा अधिक तपास करीत आहेत.