(खेड)
शहरातील सम्राट अशोकनगर येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू बाळगळ्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक मुरलीधर जाधव (४५, रा. सम्राट अशोकनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्या घराच्या पडवीत गावठी हातभट्टीची दारू आढळली. या बाबत पोलीस नाईक पुंजऱ्या कोकणी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली