(खेड)
गांजा विक्रीप्रकरणी खेडमध्ये एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याला गांजा देणाऱ्या रायगड जिल्ह्याला एकालाही अटक करण्यात आली आहे.
शहरातील साईबाबा मंदिर, नगर परिषद कर्मचारी वसाहत येथे प्रथमेश नरेंद्र कानडे (३२, कातळ आळी, खेड, रत्नागिरी) याला गांजा विक्री करताना १६ रोजी पकडण्यात आले. ४४५ ग्रॅम वजनाचा सुमारे ६,६६३ रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. तब्येत बिघडल्यामुळे त्याला मंगळवारी (२१ रोजी) अटक करण्यात आली.
किराणा व्यापारी मुकेश विश्राम दोरकर (३३, रा. बडवली, ता. महाड, जि. रायगड) याच्याकडून गांजा आणल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे दोरकर यालाही अटक करण्यात आली आहे.