( खेड / प्रतिनिधी )
तालुक्यातील लोटे एमआयडीसीमध्ये इलेक्ट्रिक पोलवर चढून काम करत असताना पोलला ट्रकची धडक बसून खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा सांगली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय बाजीराव चव्हाण (वय ३०) ही घटना ४ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय चव्हाण पोलवर करत होता. त्याच वेळेस खालून जाणाऱ्या ट्रकची पोलला धडक बसली. त्यात संजय पोलवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्याला नजीकच्या परशुराम रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने भारती हॉस्पिटल सांगली येथे दाखल केले. मात्र, तेथे ठिकाणी उपचार सुरू असताना त्याचा २५ मार्चला मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.