( खेड / प्रतिनिधी )
महाड येथील 45 वर्षीय कामगाराचा खेड मध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मंगेश गायकवाड असे मृत तरूणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, मंगेश गायकवाड हा महाड तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी आहे. तो एका लाकूड व्यावसायिकाकडे कामास होता. या ठिकाणी झालेल्या वादातून कुंभाड येथे घातपात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा मृतदेह शनिवारी सायंकाळच्या सुमारास आढळून आला. गेले महिनाभर संपर्क न झाल्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. अखेर त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनाही घातपाताच्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर तरूणाच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे.