(संगलट -खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील संगलट गावचे सुपुत्र आणि चिपळूण पाग येथे स्थायिक असलेले चिपळूणचे प्रख्यात बिल्डर नाझीमभाई अफवारे यांचे चिरंजीव मोहम्मद सलीम याने बी. ई. इंजिनिअरिंग मध्ये गुणवत्ता यादीत अव्वल स्थान संपादन केले आहे. या यशामुळे सलीम याच्यावर खेड तालुक्याबरोबर चिपळूण तालुक्यातूनही अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
सलीम यांचे वडील नाझीमभाई अफवारे हे नेहमी समाजकार्यामध्ये अग्रेसर असताना ते चिपळूणमध्ये अनेक समस्या सोडवत आहेत. सध्या ते मुस्लिम समाजाच्या प्रमुख कार्यकारीणीवर पदाधिकारी आहेत, त्यांचा मुलगा सलीम याने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यश संपादन केल्यामुळे मुलाने आई वडिलांचे नाव उज्वल केले असल्याची प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.
सलीम याच्या यशाबद्दल संगलट गावातून मुराद भाई अफवारे, ज्येष्ठ पत्रकार इक्बाल जमादार, हमीद नाडकर अकबर नाडकर, बशीरभाई जमादार, मुजीबभाई नाडकर आदी मान्यवरानी त्याचे विशेष अभिनंदन केले आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या.