(खेड / भरत निकम)
खेड तालुक्यातील खवटीचे सुपुत्र व दैनिक रत्नागिरी टाइम्सचे खेड प्रतिनिधी दिलीप स. देवळेकर यांची महाराष्ट्र शासनाने अधिस्वीकृती पत्रकार पदी नियुक्ती केल्याने स्वातंत्र्यदिनी सन्मानचिन्ह देवून गौरव केला आहे. यावेळी रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र.अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.