( रत्नागिरी / प्रतिनिधी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोलीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे “बंदिस्त खेकडा पालन संचः हाताळणी आणि व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर, २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण संचालक डॉ. आनंद नरंगळकर आणि संशोधन केंद्र प्रमुख डॉ. पी. ई. शिनगारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम दि. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आसिफ पागारकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. आसिफ पागारकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये खेकडे संवर्धन अत्याधुनिक संच पद्धतीमध्ये खेकडे पालन हे कमी जागेत व कमी पाण्यात केली जात असल्यामुळे हा व्यवसाय सुरु करण्यास चांगली संधी आहे असे सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. कल्पेश शिंदे, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी यांनी केली. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, आणि डॉ. संतोष मेतर, अभिरक्षक हे उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र चौगले, सहाय्यक संशोधनं अधिकारी यांनी केले तर या कार्यक्रमाचे समन्वयकाचे काम प्रा. कल्पेश शिंदे, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी पार पाडली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, वसई, नाशिक, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील प्रशिक्षणार्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, विशेष म्हणजे या प्रशिक्षणास गोवा कृषी विज्ञान केंद्र तसेच गोवा मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी प्रशिक्षणार्थी म्हणून हजर होते.
प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत तीन दिवसात खेकडा पालन संच हाताळणी व व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमात खेकडा पालनः सद्यस्थिती व वाव, खेकड्यांच्या जातींची ओळख व जीवनचक्र, जिवंत खेकडा पालन संच व हाताळणी, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अर्थशास्त्र व प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, खेकडा काढणी व काढणी पश्चात काळजी तसेच विक्री व्यवस्थापन या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमा करीता प्रत्यक्ष या व्यवसायामध्ये काम करीत असलेले सातपाटी येथील श्री. आनंद तरे व उरण येथील श्री. जगदीश पाटील यांनी ऑनलाईन गुगलमिटद्वारे अनुभव कथन करून खेकडा संच प्रत्यक्ष कसे हाताळणी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. २ डिसेंबर २०२२ रोजी पार पडला. यावेळी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण पुस्तिका यांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या भावना व आलेले अनुभव कथन केले. कृषी विज्ञान केंद्र, गोवाचे डॉ. हृषिकेश पवार यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने गोवा येथे खेकडा पालन प्रशिक्षण आयोजित करण्याची आशा व्यक्त केली. तर मत्स्य व्यवसाय विभाग, गोवा येथील मत्स्य तांत्रिक श्री. रायकर यांनी यांनीसुद्धा या प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम गोवा राज्यात आयोजित करण्याची आशा व्यक्त केली. पुणे येथील प्रशिक्षणार्थी श्री. कमलेश काकडे यांनी या खेकड्यांचे संवर्धन बाबत प्रशिक्षण हे फक्त डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेले खेकड़ा प्रकल्प, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी हे एकमेव केंद्र देत आहे याबाबत गौरोद्वार काढलेत. समारोप मार्गदर्शन भाषण दरम्यान संशोधन केंद्राचे प्रभारी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. ए.यु. पागरकर यांनी ‘विकेल ते पिकेल’ या अभियान प्रमाणे खेकड्यालाहि बाजारात मागणी असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. प्रमोद सावंत हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘खेकडा संवर्धन : किचन गार्डन रुपात असे कार्यक्रमाच्या फलीतावर भाष्य केले. किचन गार्डन प्रमाणेच आपण कमी जागेत व्हर्टिकल क्रॅब फार्मींग आपल्या गॅलरीत, टेरेसवर, परस बागेत करू शकतो. याद्वारे महिला बचत गट, तरुण बेरोजगार तसेच मच्छीमार बांधव यांना वरदान ठरेल असे सांगितले. तसेच त्यांनी भविष्यातील कार्यक्रम सोपस्कार पार पाडणे करिता कृषी विज्ञान केंद्र, गोवा यांचेशी कोंकण कृषि विद्यापीठाचा सामंजस्य करार करण्याची मनीषा व्यक्त केली. तसेच कोंकण कृषि विद्यापीठाचे सर्वच केंद्रे शेतकर्याना मार्गदर्शन करण्याची परंपरा उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत आहे या बद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना अभिरक्षक डॉ. संतोष मेतर यांनी केली, सूत्रसंचालन सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. सचिन साटम यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक संशोधनं अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. कल्पेश शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास श्री. रमेश सावर्डेकर, श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्री. दिनेश कुबल, श्री. सचिन पावसकर, श्री. मनिष शिंदे, श्री. मुकुंद देवूरकर, श्री. अण्णासाहेब कारखेले, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, सौ. रेश्मा तेरवणकर, श्री. प्रविण गायकवाड तसेच श्री. स्वप्नील अलीम, श्री. तेजस जोशी, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. महेश बाणे, श्री. गुरुदत्त किल्लेकर, श्री. योगेश पिलणकर आणि श्री दर्शन शिंदे यांनी विशेष मेहनत घेतली.