भारत सरकार देशातील नागरिकांसाठी वेळावेळी नवनवीन योजना घेऊन येत असतं. इतक्या योजना असतात की, त्यातून आपल्यासाठी नेमकी कोणती योजना आहे हे समजत नाही किंवा त्याची माहिती सर्वांना नसते. आज एक अशी सरकारी वेबसाईट ची माहिती घेऊ जिच्या माध्यमातून आपल्यासाठी खास असणाऱ्या सर्व योजनांची माहिती मिळू शकते. याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुढे सांगितली आहे.
सरकार कडून योजनांची घोषणा केली जाते परंतु बऱ्याचदा या योजना त्या लोकांपर्यंत पोहचत नाहीत ज्यांच्यासाठी या बनलेल्या असतात. तर काहींना या माहितीसाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात, रांगा लावाव्या लागतात. एवढी मेहनत आणि वेळ देऊन देखील अनेकदा अपुरीच माहिती मिळते.
Myscheme पोर्टल
केंद्र सरकारनं लोकांना सर्व सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी एक पोर्टल Myscheme लाँच केलं आहे. या पोर्टलवर सर्व योजनांची माहिती दाखवली जाते. तसेच या पोर्टलवरून तुम्ही तुमच्यासाठी असलेल्या योजनेची माहिती घेऊ गक्त. या पोर्टलमध्ये सरकारी योजनेच्या माहितीसह आवश्यक कागदपत्र देखील सांगितली जातात.
तुमच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांची माहिती अशी मिळवा
स्टेप 1: सर्वप्रथम लॅपटॉप किंवा फोनच्या ब्राउजरवर Myscheme असा सर्च करा.
स्टेप 2: पहिली लिंक ऑफिशियल वेबसाइट myscheme.gov.in ची येईल त्यावर क्लिक करा. इथे तुम्हाला ‘Finds Scheme For You’ लिहलेलं एक बटन दिसेल त्या बटनवर क्लिक करा.
स्टेप 3: एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात तुम्हाला लिंग, वय आणि काही आवश्यक माहिती विचारली जाईल ती भरून ‘Next’ वर क्लिक करा.
स्टेप 4: पुढील पेजवर तुमचं राज्य निवडा तसेच तुम्ही ग्रामीण भागात राहता की शहरी भागात ते सांगा आणि ‘Next’ वर क्लिक करा.
स्टेप 5: त्यानंतर तुम्हाला तुमच्या जातीची माहिती द्यावी लागेल.
स्टेप 6: पुढील पेजवर तुमच्या अपंगत्वाची माहिती आणि तुम्ही अल्पसंख्यक आहात की नाही हे विचारलं जाईल.
स्टेप 7: पुढे तुम्ही शिक्षण घेत आहात की काम करत आहात हे विचारलं जाईल. तसेच सरकारी नोकरी आहे की नाही याची माहिती द्यावी लागेल.
स्टेप 8: पुढे तुम्हाला तुमच्या कामाची माहिती द्यावी लागेल, तसेच बीपीएल (दारिद्र्य रेषा) वर्गात येत की नाही हे सांगावं लागेल. तसेच तुमचे वार्षिक उत्पन्न देखील विचारलं जाईल.
स्टेप 9: ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर तुमच्यासाठी वेगवेगळ्या कॅटेगरी जसे की सोशल वेलफेवर अँड एंपावरमेंट, हेल्थ अँड वेलनेस, बँकिंग, फायनॅन्शियल अँड इन्शुरन्स, यूटिलिटी अँड सॅनिटायजेशन, अग्रीमेंट अँड रूलर एंप्लॉयमेंट, स्किल अँड एंप्लॉयमेंट आणि हाउसिंग मधील योजनांची माहिती मिळेल. यावर क्लिक करून तुमच्यासाठी असेलल्या योजनांची सविस्तर माहिती घेऊ शकता.