(चिपळूण /ओंकार रेळेकर)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्टस् प्रा. लि. या डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. संपूर्ण प्रकल्प पाहिल्यानंतर खासदार राऊत यांनी या प्रकल्पाचा गौरव करत प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा वशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
खासदार विनायक राऊत आज चिपळूणच्या दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी वाशिष्ठी डेअरीला सदिच्छा भेट देऊन संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुका प्रमुख विनोद झगड़े, संघटक राजू देवळेकर, समन्वयक मंगेश शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे, सामजिक कार्यकर्ते संतोष उतेकर, प्रशांत मुळये आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.
फोटो : खासदार विनायक राऊत यांचा सत्कार करताना
प्रशांत यादव आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)