(गणपतीपुळे /वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव धामणे गवाणवाडी येथील श्री वाघजाई देवी नमन नाट्य मंडळ, श्री जांगलेश्वर सेवा मंडळ व महिला मंडळ यांचे वतीने श्री देव जांगलेश्वर मंदिर प्रतिष्ठापना जिर्णोद्धार सोहळा व श्री सत्यनारायणाची महापूजा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दिनांक ३ व ४ मे रोजी करण्यात आले आहे.
या निमित्ताने विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून बुधवार दिनांक ३ मे २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता श्री देव जांगलेश्वर मूर्ती प्रतिष्ठापना, सकाळी अकरा वाजता मंदिर कलशारोहण, दुपारी साडेअकरा वाजता मंदिर व रंगमंच उद्घाटन सोहळा, दुपारी दीड वाजता महाप्रसाद, संध्याकाळी चार वाजता मुलांचे खेळ, संध्याकाळी साडेसात वाजता श्रींच्या आरत्या व भोवत्या, रात्रो साडेनऊ वाजता रेकॉर्ड डान्स, रात्रो साडेदहा वाजता नमन आणि गुरुवार दिनांक ४ मे २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता श्रीं ची नित्य पूजा व आरत्या, सकाळी दहा वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी एक वाजता महाप्रसाद, संध्याकाळी तीन वाजता महिलांचा हळदीकुंकू समारंभ, संध्याकाळी साडेसात वाजता श्रींच्या आरत्या व भोवत्या, साडेनऊ वाजता मान्यवरांचा सत्कार व मनोगत आणि रात्री साडेदहा वाजता संपूर्ण कार्यक्रमानिमित्त खास करमणुकीचा विशेष कार्यक्रम म्हणून खालगांव धामणे गवाणवाडी येथील श्री वाघजाई देवी नमन नाट्य मंडळाच्या वतीने कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी दोन अंकी नाटक “वेडी माणसं” सादर होणार आहे.
यावेळी धामणे गवाणवाडीतील नाट्य कलाकार आपला अभिनय सादर करणार असून हा नाट्य प्रयोगाचा कार्यक्रम खास आकर्षण ठरणार आहे. या कार्यक्रमात मंदिर उद्घटक म्हणून जनार्दन चिमाजी धामणे तर प्रमुख उपस्थिती म्हणून खालगांव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाशजी खोल्ये आणि वस्ताद कविवर्य शक्तीवाले शाहिर चंद्रकांतजी गोताड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाला खालगांव परिसरातील भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रमुख निमंत्रक संतोष महादेव धामणे व रवींद्र कुवार यांनी केले आहे.