रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी परिसरामध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने प्रशासनाने खालगाव-जाकादेवी परिसराला कंटेनमेंट म्हणून जाहीर केला. या कालावधीमध्ये जाकादेवी बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. शनिवार दिनांक २६ जूनपासून आज सोमवार दि.५ जुलै पर्यंत सलग दहा दिवस खालगाव जाकादेवी मुख्य बाजारपेठ बंद स्वरूपात आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
खालगाव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र, जाकादेवी यांच्या सहकार्याने खालगाव जाकादेवी जास्त लोकवस्तीच्या दिड किलोमीटरच्या परिसरातील सुमारे चौदाशे पन्नास एवढ्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यापैकी केवळ दहा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे चाचणीत सिद्ध झाले. अशा पॉझिटिव्ह रुग्णांवर रत्नागिरी येथे उपचार सुरु आहेत. एप्रिल महिन्यापासून शंभरपेक्षा अधिक रुग्ण जाकादेवी येथे कोरोना पॉझिटिव्ह active रुग्ण म्हणून नोंद करण्यात आली. शिवाय अलीकडच्या कालावधीत सुमारे ३५ रुग्ण परिसरात पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे प्रशासनाने खालगाव जाकादेवी परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला. परिसरातील नागरिकांच्या कोरोना चाचणी साठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,आशा, अंगणवाडी सेविका, प्राथमिक माध्यमिक विभागातील शिक्षक शिक्षिका, तलाठी,आरोग्य केंद्रातील औषध निर्माता विभाग,स्वच्छता विभाग, खालगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सक्रिय ग्रामपंचायत सदस्य, सेवाभावी व्यक्ती यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. गेले दहा दिवस जाकादेवी मुख्य बाजारपेठ बंद राहिल्याने ग्राहकांना खरेदी-विक्रीसाठी बाजाराविना घरी थांबावे लागत आहे.प्रशासनाने केलेल्या आवाहनाला जाकादेवी खालगाव परिसरातील व्यापारी वर्गाने उत्तम सहकार्य दिले. ग्राहकांची वर्दळ कमी असल्यामुळे परिसरामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे .कंटेनमेंट झोन लागू झाल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत. इतर सर्व दुकाने बंद असल्याने ग्राहकांना बाजारहाट करण्यासाठी काही प्रमाणात अन्यत्र जावे लागत आहे. जाकादेवी खालगाव परिसर कंटेनमेंट zone मधून मुक्त व्हावा, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत खालगाव अधिक प्रमाणात मेहनत घेत आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे सुचवले जात आहेत. खालगाव जाकादेवी परिसरातील कोरोना टेस्टिंगचा रिपोर्ट खालगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून प्रशासनाला पाठवण्यात आला आहे.खालगाव जाकादेवी मुख्य बाजारपेठ कधी सुरू होणार? याकडे ग्राहकांचे डोळे लागले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी खालगावचे सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर व त्यांचे सर्व सहकारी,तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ महेश मोरताडे,तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वरदा कदम आणि त्यांची सर्व टीम अधिक प्रमाणात मेहनत घेत
आहेत.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !