(रत्नागिरी)
खारवी समाज सेवा मंडळ मुंबई स्थित खारवी समाजाचे स्नेहसंमेलन मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे समाजसेवक श्री.गंगाधर तावडे यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे समाजसेवक यशवंत डोर्लेकर, कै. रघुनाथ आंबेरकर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था पनवेल अध्यक्षा – सौ. आंबेरकर, संचालक अमोल आंबेरकर, खारवी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष शंकर लाकडे मंडळाचे उपाध्यक्ष शशिकांत हरस्कर, भजनसम्राट भगवानबुवा लोकरे, मंडळाचे माजी अध्यक्ष पामाजी वासावे, महीला अध्यक्षा सौ.मिनाताई पावसकर व मान्यवर आणि समाज बंधु-भगिनींच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले.
यावेळी मान्यवरांनी समाज पररबोधनपर भाषणे केली. या वेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष श्री. लाकडे म्हणाले, गावोगावी समाजातील मुले शिकत आहेत. विविध शैक्षणिक शेत्रात उज्वल यश संपादन करीतआहेत. त्यांच्या शिक्षणाचे चिज व्हावे म्हणून ते मुंबईत येण्यासाठी प्रयत्नात असतात. परंतु मुंबई मध्ये त्यांची राहण्यासाठी सोय होत नाही. त्यामुळे त्यांची प्रगती खुंटली जाते. त्यामुळे मंडळाने दूरदृष्टी ठेवून धाडसी निर्णय घेतला आहे तो म्हणजे महामुंबई मध्ये मंडळाची जागा असणे. त्याकरीता मंडळाने निधी संकलनाचे काम हाती घेतलेले आहे. त्याला सर्वांनी यथाशक्ती मदत करावी.
फोटो : कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर अमोल आंबेरकर, सौ.माधुरी आंबेरकर, सौ.मिना पावसकर, शशिकांत हरस्कर, गंगाधर तावडे, यशवंत डोर्लेकर, अध्यक्ष शंकर लाकडे, पी. एम. वासावे,भगवान बुवा लोकरे, राम सारंग आदी मान्यवर