(रत्नागिरी / प्रतिनिधी)
खात्यामध्ये पुरेसे पैसे नसतानाही अधिक रकमेचा धनादेश देवून अनादर करणाऱ्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आल़ी. शब्बीर कासम खान (49, ऱा शिवखोल राजीवडा, रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आह़े. शब्बीर याला 3 लाख 50 हजार रूपये दंड व 6 महिने कारावासाची शिक्षा कायम ठेवण्यात आल़ी. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बीले यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा.
खटल्यातील माहितीनुसार, शब्बीर याने रत्नागिरी येथील फायनान्स कंपनीमधून 31 मे 2012 रोजी 5 लाख रूपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज 48 हत्यामध्ये फेडण्याचे शब्बीर याने कंपनीला मान्य केले होत़े. मात्र कर्जाचे हप्ते थकित राहिल्याने शब्बीरने 9 एप्रिल 2014 रोजी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेचा 3 लाख रूपयांचा धनादेश फासनान्स कंपनीला दिल़ा. मात्र, बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने हा धनादेश अनादरित झाल़ा. याप्रकरणी फायनान्स कंपनीकडून न्यायालयात निगोशिएबल इन्स्टुमेंट ऍक्ट 138 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आल़ा.
या प्रकरणी निकाल देताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शब्बीर याला दोषी मानून 3 लाख 50 हजार रूपयांचा दंड व 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावल़ी. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरूद्ध शब्बीरने सत्र न्यायालयात अपील केले होत़े. यासंबंधी 5 जानेवारी 2023 रोजी सत्र न्यायालयाने शब्बीर याचे अपील फेटाळून लावत पूर्वीची शिक्षा कायम ठेवत असल्याचा निकाल दिला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आल़ी.