(मुंबई)
आधुनिक तंत्राचा वापर करून उत्पादन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांसाठी खरीप पीक उत्पादन स्पर्धा आयोजित केली आहे. शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याला ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यात येत असतात. शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेता येईल, यासाठी नवनवीन प्रयोग राबविले जातात.
आता शेतकऱ्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामात एक महत्त्वाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेण्यासाठी आणि स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती करणे तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यास ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे.