(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथील नँशनल कॉम्प्युटर सेंटरच्यावतीने स्वातंत्र्यदिन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आलेल्या या स्पर्धेत दि मॉडेल इंग्लिश स्कुलची विद्यार्थीनी तन्वी बळकटे हिने प्रथम क्रमांक पटकावला. आरव जाधव याने द्वितीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत दिधी डाफळे,धनश्री बळकटे, आर्या चौघुले, गुरुनाथ धातकर, शुभम जाधव, खुशी आंबेकर, मंदा भुवड, नंदिनी जाधव व आर्यन पवार हे विद्यार्थी ही सहभागी झाले होते. सहभागी सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा नँशनल काम्प्युटर सेंटर खंडाळाचे संचालक अमर मोहित यांच्याकडून प्रशस्तीपत्र देवून विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष माद्रे व सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.