संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत महिला पोलीस काँन्स्टेबल विजया तांबडे यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश पांडुरंग भुवड (५५) असे गळफास लावूून आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. प्रकाश भुवड यांनी राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर तपासाअंती आत्महत्येपुर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलीसांच्या हाती लागली. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे यामध्ये स्पष्ट केले आहे. पत्नीच्या जाचाला कंटाळून व वाईट वागण्यामुळे मी आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहीण्यात आले आहे. तसेच शेजारी राहणारा सुरेश भुवड व त्याचा मुलगा आदींनी आपली वडीलोपार्जीत जमिन बळकावली असलेबाबत व आपले मृत्यूमध्ये त्यांचा देखील सहभाग असल्याचे प्रकाश भुवड यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. यानुसार प्रतिभा प्रकाश भुवड, सुभाष शितप, सुनंदा बाचिम, सुरेश भुवड या आरोपींवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस करीत आहेत.