( रत्नागिरी )
शहरातील क्रांतिनगर येथील कमानीच्या बाजूला टी स्टॉलच्या बोळात विनापरवाना मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निहाल करिम होडेकर (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २६) सायंकाळी सातच्यासुमारास क्रांतिनगर येथील टी स्टॉलच्या बोळात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित अवैध मटका जुगार चालवत असताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याच्याकडून साहित्यासह ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल अमोल भोसले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.