रत्नागिरी जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय मध्ये मायक्रोबायोलॉजी विभागामध्ये कोविड १९ रोगाच्या चाचण्या केल्या जातात. सदर चाचण्या करिता सुमारे १ कोटी २० लाखाचे मशीन उपलब्ध असून अनुभवी तंत्रज्ञान मार्फत जिल्हयातील तसेच तालुक्यातील नागरिकांचे स्वाब घेऊन जिल्हा रुग्णालयांतील मायक्रोबायोलॉजी विभागात चाचणी करीता पाठविले जातात. परंतु सदर विभागातील अनागोंदी कारभारामुळे चुकीच्या असल्याचे निदर्शनास येत आहे.
सदर विभागातील Test Done – Detection of SARS-COV2 RNA by Real Time RT-PCR Method करिता नमुना २२/०४/२०२१ व २३/०४/२०२१ प्राप्त झाला असून नमुन्यानुसार २४/०४/२०२१ रोजी सायंकाळी ४.२० वाजता प्राप्त रिपोर्ट नुसार प्राथमिक आरोग्यकेंद्र चांदेराई पाठविला असता SAR 2749200099408 वय ४० सेक्स फिमेल रिझल्ट पॉझिटिव्ह तसेच 2749200099414 वय ४० सेक्स फिमेल रिझल्ट पॉझिटिव्ह 2749200099403 वय ४० सेक्स फिमेल रिपोर्ट पॉझिटिव्ह असे कळविले आहे. वरील सर्व चाचणी धारक हे सेक्स मेल म्हणजे पुरुष असून त्याच्यामध्ये १ चाचणी धारक वय वर्ष २२ व इतर वेगवेगळ्या वयाच्या व्यक्ती आहेत. शिवाय खासगी रुग्णालयात वय वर्ष २२ यांची चाचणी केली असता निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
वरील सर्व माहितीचा आढावा घेता सर्वसाधारण रुग्णालयातील अहवाल हे चुकीचे व पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा आकडा फुगवून जनतेची एकप्रकारे क्रूर चेष्टा केल्याचे निदर्शनास येत आहे. तरी या अनागोंदी कारभाराची व तेथील कार्यरत असणारे तंत्रज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांची कायदेशीर चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा.अशी मागणी भाजपा सहप्रवक्ते नित्यानंद दळवी यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.