(संगमेश्वर/दिनेश आंब्रे)
श्रीम क पा मुळ्ये हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोळंबे व भागशाला वांद्री येथे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार “आझादी का अमृत महोत्सव” या निमित्ताने प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीमध्ये संस्था अध्यक्ष नयनभाऊ मुळ्ये मुख्याध्यापक संजय मुळ्येसर, पर्यवेक्षक रवी मुळ्येसर, वांद्री सत्रप्रमुख बिवलकर मॅडम, खांबेसर, कोळपेसर व सर्व शिक्षक गावचे सरपंच ,ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित होते.
यावेळी शाळेतील मुलामुलींनी विविध घोषणा दिल्या, भारत मातेचे गीत गाऊ तिरंगा घरोघरी लावु , तिरंगा आमची शान आहे, सर्व भारतीयांचा मान आहे, अशा अनेक घोषणा देऊन देशाविषयी अभिमान व्यक्त केला. यावेळी पावसानेही दमदार हजेरी लावली होती. प्रभात फेरीमधील विद्यार्थ्यांची तसेच विविध कलाविष्कार यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. डौलाने दुमदुमत जाणारी प्रभातफेरी अखेर “हर घर तिरंगा, हर मन तिरंगा” अशा आनंदाच्या वातावरणात व उत्स्फूर्तपणे संपन्न झाली