( प्रतिनिधी / रत्नागिरी )
कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील देवरूख मेढे येथे बोलेरो पीकअप उलटून ९ जण जखमी झाल्याची घटना ८ जानेवारी रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात चालकासह ८ जण जखमी झाले होते. यापैकी ४ जणांना गंभीर दुखापत झाली होती. कृष्णा सोनु बेलकर (दाभोळे, बेलकरवाडी ता. संगमेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोलेरो चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा बेलकर हा आपल्या ताब्यातील बोलेरो गाडी घेऊन कोंडगाव, वाणीवाडी येथील हॉटेल साई पार्क येथुन जेवण करुन परत गावी दाभोळे येथे रत्नागिरी कोल्हापुर रोडने जात होता. यावेळी मेढे बस स्टॉपच्या पुढील वळणावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थीतीकडे लक्ष न दिल्याने तसेच वळनाचा रस्ता असुनही त्याकडे लक्ष न देता, हयगयीने अविचाराने, बेदरकारपणे अतिवेगात गाडी चालवल्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला उजवे बाजुला जावुन बोलेरो पीकअप उलटली. या अपघातामध्ये गाडीमध्ये बसलेल्या दिपक कृष्णा बेलकर, सचिन शांताराम बेलकर, विनायक गणपत आंबेकर, सुरज आंबेकर यांना गंभीर दुखापत झाली. तसेच प्रितेश चंद्रकात बेलकर, गणेश गंगाराम चव्हाण, सुमीत सखाराम आंबेकर यांना किरकोळ दुखापती झाल्या.
या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबतची फिर्याद साखरपा पोलीस दूरक्षेत्रातील राहुल सर्जेराव गायकवाड – पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी दिली. या प्रकरणी बोलेरो चालक कृष्णा सोनु बेलकर याच्यावर भा.द.वि.का.क. २७९, ३३७, ३३८ मो.वा.का. क. १८४,६६/१९२ (अ) अंतर्गत देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास देवरूख पोलीस करत आहेत.