(कोल्हापूर)
कोल्हापूर लव्ह जिहाद प्रकरणी बेपत्ता मुलीला शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम तरुणासह कर्नाटक राज्यातील संकेश्वरमध्ये सापडली आहे. या दोघांनाही संकेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतलं असूनआता दोघांचा ताबा घेण्यासाठी कोल्हापूर पोलीस कर्नाटककडे रवाना झाले होते. नितेश राणे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांनी काल कोल्हापूरमध्ये आंदोलन करून मुलगी न सापडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
बेपत्ता मुलीसह तरुणाच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचा फोटो जाहीर केला होता. अल्ताफ काझी (वय२२वर्ष) या संशयिताचा फोटो कोल्हापूर पोलिसांनी प्रसिद्ध करत, अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचं आवाहन केलं होतं.
कोल्हापुरातील ही मुलगी १७ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. ही मुलगी इयत्ता नववीमध्ये शिकत होती. दिवाळीपूर्वी शाळेचा शेवटचा पेपर द्यायला गेलेली मुलगी परतली नसल्यामुळे नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.१७दिवस उलटूनही मुलीचा अद्याप शोध लागला नव्हता. मुस्लिम युवकानेच या मुलीला पळवल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सदर बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी कर्नाटक राज्यातील संकेश्वरमध्ये सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.